भंडारा : मानेगाव बाजारात क्षुल्लक वादातून वृद्धाची हत्या; मुलगाही गंभीर जखमी

 भंडारा जिल्‍हातील मानेगाव बाजार येथे गाय धूत असताना घराच्या आवारात पाणी वाहून जात होते. या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात एका वृद्धाची हत्या करण्यात आली. आणि त्‍यांच्या मुलाला गंभीर मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.12) घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मानेगाव बाजार येथील मते आणि बोंदरे कुटूंब शेजारी राहतात. दोन्ही कुटूंबात काही वर्षांपासून वाद आहे. मंगळवारी संध्याकाळी महादेव बोंदरे हे आपल्या गाईला घरासमोरील रस्त्यावर धूत होते. गाय धूत असताना ते पाणी मते यांच्या घरातील आवारात आल्याने चंद्रशेखर मते याने महादेव बोंदरे यांच्याशी भांडण केले. त्‍योवळी महादेव यांचा मुलगा दिनेश याने भांडण सोडवण्याचा सोडवण्याच्या प्रयत्‍न केला असता त्यांला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी बापलेकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, विक्की मते याने घरातून काठी आणली. आणि अन्य आरोपींनी दिनेशला पकडून काठीने मारहाण केली. यावेळी वडील महादेव त्याला वाचविण्यासाठी गेले असता महादेव यांच्या डोक्यावर काठीने वार केला. महादेव यांच्या डोक्‍यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जागीच त्‍यांचा मृत्यू झाला. तर दिनेश गंभीर जखमी आहे.

महादेव श्रीपत बोंद्रे ( वय ५६) रा. मानेगाव बाजार असे मृताचे नाव आहे. तर दिनेश महादेव बोंद्रे असे गंभीर जखमीचे नाव आहे. चंद्रशेखर विठोबा मते ( वय ५०), विक्की चंद्रशेखर मते (वय २४), मयूर चंद्रशेखर मते (वय १९), सरिता चंद्रशेखर मते (वय ४७) हे सर्व मानेगाव बाजार येथे राहत आहेत. याप्रकरणी कारधा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

Crime News

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e