नाशिक : दवाखान्यालगत रात्री टेम्पो पार्क केला, सकाळी पाहतो तर...

 येथील स्वारबाबानगर, मायको दवाखान्यालगत सोमवारी (दि.११) रात्री पार्क केलेल्या टेम्पोतून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचे मटेरियल लंपास केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित ट्रान्स्पोर्टचा टेम्पो (एमएच १५ एजी ६३८९) स्वारबाबानगर, मायको दवाखान्यालगत सोमवारी रात्री १० च्या दरम्यान पार्क केला होता.

सोमवारी रात्री १२ ते पहाटे ५ च्या दरम्यान या टेम्पोतून अडीच लाखांचे चारचाकी व दुचाकीचे इंजिनचे सुट्टे भाग अज्ञात चोरट्यांनी लांबविले. या प्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

Khabardar Crime News

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e