पिंपरी : पत्नीच्या आत्महत्यानंतर पतीनेही घेतला गळफास

  प्रेम विवाहानंतर पाचच महिन्यात तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. १०) चिंचवड येथे घडली. त्यानंतर विरह सहन न  झाल्याने तिच्या पतीनेही बुधवारी (दि. १३) गणेशनगर, डांगे चौक येथे गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे.

अक्षय अंबिलवादे (२५, रा. गणेशनगर, डांगे चौक) आणि अश्विनी जगताप-अंबिलवादे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अक्षय आणि अश्विनी डांगे चौक येथील गणेशनगरमध्ये लहानाचे मोठे झाले. दोघांनीही खिंवसरा पाटील या मराठी माध्यमाच्या शाळेत दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनी विवाह करण्याचे ठरवले. दोघांनीही घरच्यांना विश्वासात घेऊन २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मोठ्या थाटामाटात प्रेमविवाह केला.

अक्षयला चिंचवड येथील एका सराफाच्या दुकानात नोकरी मिळाली. त्यामुळे अक्षय अश्विनी सोबत चिंचवड येथे राहू लागला. दरम्यान, अश्विनीने रविवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतलेल्या अश्विनीने अचानक साथ सोडल्याने अक्षय खचला होता.

अश्विनीचा अंत्यविधी झाल्यानंतर तो आई वडिलांसोबत डांगे चौक येथे आला होता. त्याच्या मित्र परिवाराला अक्षय काहीतरी चुकीचे पाऊल उचलेल, याची कल्पना होती. त्यामुळे मित्र त्याच्याजवळच बसून होते. दरम्यान, बुधवारी सकाळी मित्र अंघोळीसाठी आपापल्या घरी गेल्यानंतर अक्षयने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Khabardar Crime News

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e