जिल्ह्यात नोंदणीकृत 267 डॉक्टर्स असून नोंदणी न झालेल्या व नोंदणी नसताना व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची संख्या 166 ईतकी आहे.जालना तालुक्यात सर्वाधिक 25 डॉक्टर बोगस आहेत.तर त्या पाठोपाठ भोकरदनमध्ये 24,जाफ्राबादमध्ये 17,बदनापूरमध्ये 10,घनसावंगीत 9,परतूरमध्ये 8,अंबडमध्ये 6,मंठ्यात 4 डॉक्टर बोगस निघाले आहेत.
जिल्ह्यात ईतके डॉक्टर बोगस असताना आतापर्यंत आरोग्य यंत्रणा काय करत होती,की या डॉक्टरांची आरोग्य विभागासोबत सेटलमेंट आहे असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित होत केला जात आहे.
जालना जिल्ह्यात मुलं-मुलींच्या जन्मदरात मोठी तफावत असून पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल.कुणालाही याबाबतीत पाठीशी घालणार नाही.असं सांगत या कायद्याची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश टोपे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या नंतर कारवाई नंतर ही धक्काडायक माहिती समोर आल्या नंतर एकच खळबळ उडाली आहे.
0 Comments