आज (शुक्रवार) पहाटे वैद्यनगर पौर्णिमा बस स्टॉपच्या शेजारी पायी जात असलेल्या हरीश पाटील याची एका व्यक्तीचा दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने धार धार शस्त्राने वार करून हत्या केली होती. या हत्येमागे मागे द्वारका परिसरात झालेला वाद आणि नशेतून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात चौघा जणांना पोलिसांनी नाशिकरोड येथून ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटजेच्या आधारे या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या बराेबरच गंगापूररोड पोलीस ठाणे हद्दीत एका युवकाचा मृतदेह आनंदवल्ली भागात आढळून आला होता. डी फार्मसीचे शिक्षण घेत असलेला विपुल खैरे याचा हा मृतदेह हाेता. त्याचा देखील खून झाल्याची माहिती समोर आली होती. या खूनाचा छडा पोलिसांनी लावला आहे. वडिलांकडे चुगली का करतो या कारणावरून मित्रांनीच मित्राचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पाेलीसांनी एकास ताब्यात घेतले असून आणखी काही जणांचा नाशिक पोलीस शाेध घेताहेत. या तिन्ही खूनांचा तपास नाशिक पाेलीस करीत आहे असे पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी नमूद केले.
0 Comments