पंढरपुरमध्ये डॉ. शितल शहा यांचे नवजीवन हॉस्पिटल (Hospital) आहे. येथे नवजात बालकांवर उपचार केले जातात. काल सकाळी रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनरेटर जवळ मोठा आवाज झाल्याचे इलेक्ट्रिशियन युवराज सावंत यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी पाहणी केली असता बॅटरी कोणी तरी काढल्याचे लक्षात आले.
यावेळी लगेच रुग्णालय (Hospital) कर्मचाऱ्यांनी बॅटरी शोधण्याचा प्रयत्न केला. पण बॅटरी सापडली नाही. दरम्यान बॅटरी काढल्याने अतिदक्षता विभागात असलेल्या ६९ बालकांचा जीवाला धोका निर्माण झाला होता. पण डॉ. शितल शहा यांनी प्रसंगावधान राखत पर्यायी व्यवस्था केली. यामुळे त्या वॉर्डातील बालकांच्या जीवावरील धोका टळला आहे. दरम्यान बॅटरी चोर विरोधात पंढरपूर शहर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दिली आहे.
0 Comments