कोल्हापूर :

पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या वरिष्ठ अधिकांर्यासह जिल्ह्यातील 11 जणांना पोलिस महासंचालकांकडून शनिवारी सन्मानपदक जाहीर झाले. त्यात राज्य गुन्हे (सीआयडी) अन्वेषणचे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, सहायक निरीक्षक किरण भोसले, उत्कर्ष वझे
यांच्यासह महामार्ग सुरक्षा पथकातील तीन पोलिसांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सन्मानपदकप्राप्त अधिकारी, पोलिसांचे अभिनंदन केले.
पोलिस दलांतर्गत विविध विभागांत उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या राज्यातील आठशेवर अधिकारी, पोलिसांना पोलिस महासंचालकांनी विशेष सन्मानपदक जाहीर केले आहेत. सन्मानपदकप्राप्त अधिकार्यांची नावे पुढीलप्रमाणे ः राज्य गुन्हे अन्वेषणचे अप्पर अधीक्षक डॉ. दिनेश बारी, गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक किरण भोसले, उत्कर्ष वझे, सहायक फौजदार श्रीधर सावंत (शाहूवाडी), दीपक शेळके (विमानतळ), पोलिस हवालदार प्रशांत ओतारी (शिवाजीनगर), संजय हुंबे (विशेष पथक), राजेंद्र संकपाळ (लक्ष्मीपुरी),
पोलिस नाईक अमित सर्जे (राजारामपुरी), संदीप पावलकर (विशेष तपास पथक), महामार्ग सुरक्षा पथकातील शहाजी लखू पाटील, राहुल चद्रकांत देसाई, शंकर हरी कोळी यांनाही सन्मान पदकाने गौरविण्यात येत आहे.
रविवारी, 1 मे महाराष्ट्र दिनी शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य संचलनावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयातील ध्वजवंदनानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
0 Comments