सांगली : विवाहितेची आत्महत्या, तिघांना अटक

लक्ष्मीवाडी येथे विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पती, सासरा आणि सासू या तिघांना ताब्यात घेतले आहे. पती व सासरा यांना न्यायालयाने दि. २ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत माहिती अशी की, लक्ष्मीवाडी येथे गुरुवारी रात्री विहिरीत उडी घेऊन आरती तळंदगे या विवाहितेने आत्महत्या केली होती मात्र, सदर विवाहितेची हत्या झाल्याचा आरोप करून तिच्या नातेवाईकांनी मृत विवाहितेचा मृतदेह सासरच्या घरासमोरच दहन केला होता. याप्रकरणी सासरच्या मंडळींची कसून चौकशी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत विवाहितेच्या भावाने केली होती. यानुसार पोलिसांनी पती अभिनंदन, सासरा बाळू आणि सासू भारती या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे नवरा अभिनंदन, सासरा बाळू आणि सासू भारती या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e