पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना अटक केली असून या बंटी बबली गँगने याअगोदर पण तिघांना असंच फसवल्याचे उघड झाले.
मंडळीकडून प्रत्येकी 2 लाख रुपये उकळण्याचा कट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
ज्यामध्ये भडगाव जि.जळगाव व फुलंब्री तालुका औरंगाबाद येथील 2 व इतर अजून एका लग्नाळू मुलाचा समावेश आहे. परंतुस सदर दोन्ही वर पक्षाचे मंडळी एकाच वेळी समोरासमोर आल्याने त्यांच्यात वाद होऊन बंटी बबली गँगचं बिंग फुटलं.
या प्रकरणात जळगाव येथील वधू पक्षाकडील लोकांनी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत संशयित आरोपी सविता राधाकिसन माळी, अनिल राधाकिसन माळी (रा. सातेफळ), सुनिता बाळूमामा माळी (रा. सावंगी वर्गणी), सुषमा सुभाष बेळगे (रा. पवन नगर वाळूज पंढरपूर ), अनिल जगन्नाथ बनकर ( राहणार शृंगारवाडी ), शिला मनोहर बनकर (राहणार एक्तुनी) शितल बाबुराव निकम (रा.विसरवाडी ) या भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सातही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यातील महिला व आरोपींच्या मोबाईलमध्ये विविध मुला मुलींचे बायोडेटा आढळून आले आहे. ज्यावरून चौकशी केली असता या बंटी बबली गँगने धुळे, औरंगाबाद, जळगाव, परभणी आणि नांदेड येथील तरुणांना अशाच प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून आणि लग्नाळू मुलांच्या नातेवाईकांना लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून लुबडल्याचे निष्पन्न झाले आहे.
0 Comments