राजहंस कुंभरे, विनोद रामटेके दोन्ही रा. नवेगाव (कोका) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कोका वन्यजीव अभयारण्यालगत असलेल्या संरक्षित वनातील नवेगाव येथील
कपड़े धुवायला गेलेल्या बबिता तिरपुडे हिचा २८ एप्रिल रोजी रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला होता. बबिता हिच्या डोक्यावर काठी मारून व गळा दाबून तिचा खून केल्याचे शवविच्छेदन
अहवालातून स्पष्ट झाले होते.
याप्रकरणी कारधा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत विचारपूस केली असता आरोपी राजहंस कुंभरे याने मृत बबिता तिरपुडे हिने जादूटोणा केल्यामुळेच त्याची
पत्नी मायाबाई हिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या संशयाचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी बबिता तिरपुडे हिचा खून विनोद रामटेके याच्या मदतीने केल्याची कबुली त्याने दिली आहे. दोन्ही आरोपींना कारधा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास कारधा पोलिस करीत आहे.
0 Comments