नांदेड : नांदेडमध्ये तरुणाचे अकाऊंट हॅक करुन 69 लाख रुपये लंपास करणाऱ्या हॅकर्सचे मनसुबे सायबर टीममुळे उधळले. ड्रीम ११ ॲपवर जिंकलेली रक्कम हॅकर्सने लंपास करण्यास सुरवात केली. याचवेळी तरूणाने सायबर पोलिसात कळविल्याने हा प्रकार थांबला. शिवाय, तरुणाला संपुर्ण रक्कम पुन्हा मिळाली आहे.
नांदेडच्या तरुणाने
आयपीएलमध्ये मोबाईलवर ड्रीम 11 अॅपवर स्वतःची टिम तयार केली आणि गुजरात टायटन विरोधात टिम उतरवत एक कोटींच बक्षीस जिंकले. एक कोटी पैकी 30 लाखांच टॅक्स कमी होऊन कंपनीने तरुणाच्या अकाऊंटला 70 लाख जमा केले. जमा झालेल्या 70 पैकी तरुणाने एक लाख स्वतःच्या दुसऱ्या अकाऊंटला टाकून घेतले. याच वेळी हॅकरचा तरुणाला मोबाईल आला की आपण एक कोटी जिंकले आहेत. त्यासाठी इमेल आयडीवरील ओटीपी सांगा तरुणा ते खरेच वाटले आणि तरुणाने ओटीपी सांगितला.
सायबर टीमची सतर्कता
ओटीपी सांगितल्यानंतर लागलीच तरुणाच्या अकाऊंटवरील 69 लाख इतर खात्यात हॅकर्सच्या खात्यात ट्रान्सफर झाले. तरुणाने आपली फसवणूक झाली म्हणून पोलिसात धाव घेतली. पोलिसांच्या सायबर टीमने तातडीने संबधिताला खात्यावरील रक्कम फ्रीज करायला सांगितले. त्यामुळे तरुणाचे 69 लाख रुपये वाचले आणि हॅकर्सचा डाव फसला. आता ड्रीम 11 या मुंबईच्या कार्यालयाने बक्षीस जिंकलेल्या तरुणाचे व्हेरिफिकेशन करुन त्याच्या अकाऊंटमध्ये 69 लाख रुपये जमा केले. सुरक्षेची बाब असल्याने पोलिसांनी तरुणाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. दरम्यान, नांदेडच्या सायबर टिमने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हॅकर्सपासून तरुणाचे 69 लाख रुपये वाचविण्यात यश आले. पोलिस अधिक्षकांनी सायबर टिमचे कौतुक केले आहे.
0 Comments