चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फुस लावून पळवून नेले. तब्बल साडे सहा महिने शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. यातून ती मुलगी गर्भवती झाल्याचे गंभीर प्रकार २१ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आला आहे. भगवान (रा. चांभार्डी बु. ता. चाळीसगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पोस्को अंतर्गत ४, ६, ८, १२ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.
0 Comments