औरंगाबाद : औरंगाबादेत पाणीप्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबादेत पाणीप्रश्नावरून शिवसेना (
Shivsena ) आणि भाजपमध्ये (
BJP ) संघर्ष सुरू झाला आहे. शहरातील पाणी प्रश्नावरून भाजपने आक्रमक भूमिका घेत उद्या जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (
Devendra Fadnavis ) करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपनं जागोजागी जल आक्रोश मोर्चाचे बॅनर लावले आहेत. त्याला प्रत्युत्तर शिवसेनेनं देखील बॅनर लावले आहे. औरंगाबादेत बॅनर (
Banner) युद्ध सुरू असताना भाजपच्या जल आक्रोश मोर्चाचे बॅनर अज्ञातांनी फाडल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
औरंगाबादेत पाणी प्रश्न चांगलाचं पेटला आहे. पाणीप्रश्नावरून भाजप, मनसे, एमआयएम विरुद्ध शिवसेना पक्ष असे चित्र औरंगाबादेत पाहायला मिळत आहे. त्यात शहरात भीषण झालेल्या पाणीप्रश्नावरून भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपनं उद्या जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं आहे. त्यासाठी शहरात जागोजागी जल आक्रोश मोर्चाचे बॅनर लावले आहेत. या बॅनरविरोधात शिवसेनेनं बॅनर लावले आहेत. तर औरंगाबादमध्ये पडेगावात अज्ञात लोकांनी भाजपनं जल आक्रोश मोर्चाचे बॅनर फाडले आहे. बॅनर फाडल्यामुळं या पडेगाव परिसरात तणावाची स्थिती झाली आहे. या घटनास्थळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित झाले आहेत. बॅनर फाडल्यामुळे भाजप कार्यक्रर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
औरंगाबादेत रंगलं 'बॅनर युद्ध'
दरम्यान, औरंगाबादेत पाणीप्रश्नावरून भाजपनं भूमिका घेत जल आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे. शहरातील खडकेश्वर मंदिराच्या समोर भाजपने जल आक्रोश मोर्च्याचा माहितीचा बॅनर लावला आहे. या मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. येत्या सोमवारी म्हणाजे उद्या ४ वाजता हा मोर्चा असणार आहे, या आशयाचा बॅनर भाजपकडून लावण्यात आला आहे. भाजपच्या या बॅनरला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्ही पाणीपट्टी पन्नास टक्क्यांवर आणली आहे. तुम्ही गॅसचे भाव अर्ध्यांवर आणणार का ?, अशा आशयाचा शिवसेनेनं बॅनर लावत भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं शहरात या बॅनरबाजीची चांगलीच चर्चा सुरू आहे. यावरून भाजप-शिवसेनेमध्ये बॅनरयुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
0 Comments