वरसाडे प्र. पा. येथे नियुक्तीस असलेले ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे (वय ५२) यांच्याकडे ग्रामग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या रोजगार हमी योजनेवर रोजगार सेवक म्हणून केलेल्या कामाचे मानधन धनादेशावर सही करण्याची विनंती केली. त्यांनी स्वतःसाठी व तटस्थ व्यक्ती सरपंचपती शिवदास भुरा राठोड (वय ६७) यांच्यासह सहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती चार हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. तक्रारदाराने लगेचच जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली.
प्राप्त तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. त्यानुसार, तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने ग्रामसेवक काशिनाथ सोनवणे व सरपंचपती शिवदास राठोड यांना रंगेहात पकडले. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक एन.एस. न्याहळदे, पोलिस अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, पोलिस एन. एन. जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज कोळी, जनार्दन चौधरी, सुनील शिरसाट, प्रवीण पाटील, महेश सूर्यवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली. यामुळे पंचायत समिती प्रशासन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
0 Comments