जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वेगेट लगत असलेल्या रेल्वे मालधक्क्याजवळ तरूणाचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अनिकेत गणेश गायकवाड (रा. राजमालती नगर, जळगाव) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. खून झाल्याचे समोर आल्यानंतर ओळख पटवून पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी तरूणाच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली. मयत तरूणाच्या वडिलांनी मुलाचे पार्थिव ओळखले. यानंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला.
दारू पाजून हत्याचा केल्याचा संशय
जळगाव शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. खून झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. यामुळे खून करण्यापूर्वी मयत अनिकेत गणेश गायकवाड याला मारेकर्यांनी दारू पाजली. यानंतर त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच खूनी हे मयत तरूणाच्या परिचयातील असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
0 Comments