धुळे महापालिकेमध्ये नव्याने हद्दवाढीत सामील झालेल्या पिंपरी या गावातील नागरिकांना पालिका प्रशासनातर्फे आकारण्यात आलेला कर रद्द करण्यात यावा. तसेच धुळे शहरात भगवान एकलव्य यांची मूर्ती उभारण्यात यावी. धुळे शहरातील फाशीपूल परिसरातील भाग हा सिटीसर्वे करून प्लॉट नावावर करण्याची मागणीदेखील संघटनेच्यावतीने पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात एकलव्य संघटनेच्यावतीने आदिवासी बांधव एकवटल्याचे बघावयास मिळाले आहे.
0 Comments