वासुदेव बोंबले, पवन बोंबले दोघेही रा वेताळे, ता खेड व स्वप्नील सावंत, निलेश नाईकडे, ऋषिकेश उर्फ लखन नाईकडे, विलास परसुडे सर्व रा कडधे,ता खेड यांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कडधे गावात मंगळवारी (दि २४) रोजी एका लग्नाची रात्री सुरू होती. त्यात शंकर नाईकडे आला व त्याने काही युवकांकडे प्यायला दारूची मागणी केली. नंतर नाचणाऱ्या काही युवकांमध्ये घुसुन धक्काबुक्की करू लागला. त्यावर बाचाबाची होऊन त्याचे मारामारीत रूपांतर झाले.
शंकर याला युवकांनी त्याला बाजूला नेले. अंधारात त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. दगड, विटांनी डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर तो निपचित पडला होता. त्यानंतर त्याला एका वाहनात घालुन गावाच्या बाहेरून वाहणाऱ्या कालव्याच्या पाण्यात फेकुन दिले. अशी माहिती स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आली. अद्याप या युवकाचा मृतदेह मिळाला नसून पोलिसांकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे.
0 Comments