याबाबत सविस्तर वृत्त असं की, धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथे मायलेकाचा विहिरीखाली दबून मृत्यू झाला आहे. भिकन पवार यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा विहीर पाहण्यासाठी गेले होते. परंतु, विहीर अचानक खचल्याने तिघेही ढिघाऱ्याखाली अडकले. या दुर्देवी घटनेत भिकनच्या पत्नीचा आणि मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, पत्नी आणि मुलाचा मृतदेह चोवीस तासांनंतर बाहेर काढण्यात आला.
आपल्या शेतामध्ये सुरू असलेल्या विहिरीचे काम बघण्यासाठी तिघेही शेतावर गेले होते. परंतु विहिरीजवळ पोहोचताच अचानक विहीर खचल्याने तिघेही ढिघाऱ्याखाली अडकले.या घटनेत मृत्यू झालेल्या दोघा माय-लेकाचे मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
0 Comments