याबाबतची माहिती अशी, दशरथ दारूच्या आहारी गेला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने काबाडकष्ट करून त्याचा व त्याच्या दोन मुलांचा सांभाळ केला.
त्याची दोन्ही मुले परगावी असल्याने तो व आई असे दोघेच आगळगावच्या दक्षिणेला असलेल्या पाटील मळ्यात राहात होते. दरम्यान, बुधवारी दुपारपासून दशरथ दारू पिऊन घरात आईला मारहाण करीत होता.
सायंकाळी त्याने पुन्हा लोखंडी फुकणी व दगडाने आईला मारहाण केली. या मारहाणीत तिच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. शरीरावरील खोल जखमांमुळे रक्तस्त्रावही झाला होता. या घटनेची माहिती गणेश विठ्ठल भोसले (वय 26, रा. रांजणी) या तिच्या नातवाला (मुलीचा मुलगा) शेजारच्या लोकांनी फोनवरून सांगितली.
त्याने तत्काळ घटनास्थळी येऊन आजीला मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान गणेश भोसले यांनी गुरुवारी सकाळी या घटनेबाबात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी दशरथ जाधव याला बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले यांनी घटनास्थळी भेट दिली.
0 Comments