सत्ताधारी नगरसेवकाकडूनच सभापतींना घरचा आहेर
धुळे :
शहरातील अनेक प्रश्न, भ्रष्ट्राचाराचे मुद्दे मांडून देखील ते सोडविले गेले नाही. यामुळे महापालिकेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी पक्षातील नगरसेवक नागसेन बोरसे यांनीच सभापतींना
(Dhule) घरचा आहेर दिला आहे.
गेल्या अडीच- तीन वर्षांपासून (Dhule Corporation)
आम्ही अनेक प्रश्न व समस्या मांडत आहोत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर जाब विचारत आहोत. त्यावर सभापती कार्यवाही करण्याचे आदेशही देतात; परंतु आजपर्यंत कोणत्याच आदेशावर कार्यवाही झाली का? असा प्रश्न सत्ताधारी पक्षाचेच म्हणजेच भाजपचे (BJP) नगरसेवक नागसेन बोरसे यांनी भर सभेत कचऱ्याचे दृश्य दाखवणारे बॅनर झळकवत सभापतींना विचारला आहे.
0 Comments