हिंगोली : हिंगोलीच्या (Hingoli) वसमत तालुक्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने विवाह झाल्यानंतर, चारच महिन्यात आपल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलका विश्वनाथ पोटे वय वर्ष २१ असं मयत पत्नीचे नावं आहे. तर विश्वनाथ पोटे वय वर्ष २३ असं आरोपी पतीचे नाव आहे.
अलका आणि विश्वनाथ यांचा चार महिन्यांपुर्वी विवाह (Marriage) झाला होता हे हे दोघे पती-पत्नी शेतातील हळद काढणीच्या कामाला वसमत तालुक्यातील (Vasmat taluka) सारोळा गावच्या शेत शिवारामध्ये गेले होते. मागील दोन दिवसांपासून या दोघांमध्ये
चारित्र्याच्या संशयावरुन वाद देखील झाले होते. अशातच आज संशयाचे भूत डोक्यात शिरलेल्या विश्वनाथ याने आपल्याच पत्नीवर हल्ला करत तिच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करुन निर्घुण हत्या केली.
दरम्यान या घटनेनंतर आरोपी पती विश्वनाथ पोटे फरार झालाअसून या प्रकरणात वसमत ग्रामीण पोलिसांनी मयत विवाहीत तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके देखील रवाना केले आहेत.
0 Comments