कंडारी बु. (ता. धरणगाव) येथील उत्तम तुकाराम भिल (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उत्तम भिल यांचा मुलगा विजय व त्याचा मित्र सोमनाथ रोहीदास भिल हे विजय चालवित असलेल्या मोटारसायकल (क्रं. एमएच १९, एजी ४१९७) ने कंडारी बु. येथे घरी येत होते. यावेळी राजेंद्र पाटील हे बैलगाडीने रस्त्याने जात होते. या दरम्यान त्यांच्या शेताजवळ विजय याने मोटरसायकल रस्त्याचा परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बैलगाडीस मागून धडक मारली. यात दुचाकीवरून पडल्याने विजयच्या डोक्याला, तोंडाला, छातीला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर सोमनाथ रोहीदास भिल हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात मयत विजय उत्तम भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ खुशाल पाटील हे करीत आहेत.
0 Comments