आता देवालाही पक्षात घेणार का?; मंत्री गुलाबराव पाटील यांचा सवाल

जळगाव : देव हा सगळ्यांचा आहे. विनाकारण हा देव याचा हा देव त्याचा असे केले जात आहे. सगळ्या हिंदूंचा देव आहे. सर्व धर्माचा देव आहे. रामलल्ला आमचा नाही का? आम्ही सकाळी उठल्यावर राम राम म्हणतो. राम हे सगळ्यांचे देव आहे आता आराम राहिले आता हनुमान आमचा आहे आता तुम्ही देवालाही पक्षात घेणार आहेत का? असा सवाल पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री गुलाबराव पाटील  यांनी राणा दाम्‍पत्‍याला उद्देशून केला
शिवसेनेचे  शिवसंपर्क अभियानातंर्गत जळगावात आयोजित मेळाव्‍यादरम्‍यान माध्‍यमांशी संवाद साधताना मंत्री पाटील बोलत होते. ते म्‍हणाले, की सर्व पक्ष, सगळे नागरिक मिळून देवाची आरती केली पाहिजे. मात्र चौकटीत राहून आरती केली पाहिजे; असेही ते म्‍हणाले.

आरती हा विषय लोकप्रतिपनिधींना न शोभणारा

राणा दाम्‍पत्‍याने नागपूरात  हनुमान चालिसा म्‍हटल्‍यानंतर यावर प्रतिक्रीया देताना पाटील म्‍हणाले, की सरकार कुठे चुकतेय हे सांगायला हवे. मात्र सरकारला विनाकारण बदनाम करण्याचे काम सुरू आहे. आरती हा विषय लावून ठेवणे लोकप्रतिनिधींना न शोभणारे असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e