आमदार रवी राणा यांना अवैध बांधकामाप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
मुंबई : आमदार रवी राणा यांच्या मुंबईच्या खारमधील फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम असल्याचा आरोप करून मुंबई महापालिकेकडून या फ्लॅटचं 4 मे रोजी मोजमाप करण्यात येईल अशी नोटिस पाठवण्यात आली आहे. सोसायटीचे पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून आमदार रवी राणा यांच्या नावे ही नोटिस पाठवण्यात आली आहे.
आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत रवी राणा हे दोघंही गेल्या 10 दिवसापासून तुरुंगात आहेत. त्यामुळं त्यांच्या घरी कोणीच नाही. त्यामुळं मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंद दारावर आज नोटिस चिकटवली. मंजूर आराखड्याव्यतिरिक्त बांधकाम आणि काही नियमांच्या उल्लंघनाच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेकडून तपासणीसाठी नोटिस पाठवण्यात आली आहे
0 Comments