म्हसास येथील कैलास पाटील (वय २९) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्येसंदर्भातील स्टेटस आपल्या मोबाईलमधील (Whatsapp)
व्हॉट्सअपवर लावले व लगेचच गावालगत असलेल्या काकांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नातलग व मित्रांनी स्टेटस पाहून त्याची शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळला.
आत्महत्येची कारण अस्पष्ट
त्यास ग्रामीण रुग्णालयात (Hospital) आणले असता डॉ. अमित साळुंके यांनी त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला. मृत कैलास पाटील यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण कळले नाही. पाचोरा (Pachora) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून शून्य क्रमांकाने पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात हे प्रकरण वर्ग केले आहे.
0 Comments