राज्याचे महसूल ग्रामविकास मंत्री तथा धुळे (Dhule) जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार याचा आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media)
व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी देखील पालकमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज भाजप युवा मोर्चातर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवण्यासाठी तसेच या घटनेचा निषेध
करण्यासाठी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यापुर्वीच आंदोलनकर्ते कार्यकर्त्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे.
माफी मागा
ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानासंदर्भात त्यांनी तात्काळ जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. अन्यथा आगामी काळात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलन कर्त्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना दिला आहे.
0 Comments