प्रेमप्रकरणामुळं जन्मदात्या माता-पित्यानेच केला अल्पवयीन मुलीचा खून

कराड : सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये (Karad crime update) काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. जन्मदात्या माता-पित्यानेच प्रेमप्रकरणामुळं अल्पवयीन मुलीचा खून (Minor girl murder) केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कराडच्या येणके येथे हा खळबळजनक प्रकार घडला असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. मृत पावलेल्या मुलीचा मृतदेह पवारवाडी येथील डोंगरावर १४ दिवसांपूर्वी जमिनीत पुरला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना (culprit arrested) ताब्यात घेतलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, अल्पवयीन मुलीचा आई-वडिलांनीच खून केल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील येणे येथे उघडकीस आली आहे. कराड तालुक्यातील येणके गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी 17 एप्रिल रोजी कराड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील यांच्याकडे होता. शनिवारी रात्री फिर्यादी वडिलांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर संबंधीत गुन्ह्या आपणच केल्याची कबुली मुलीच्या वडिलांनी दिली. 'माझ्या अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण होते. त्यामुळे मी आणि माझ्या पत्नीने आमच्या मुलीचा खून केला.' अशी माहिती आरोपीने पोलीस तपासात दिली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e