एकच क्लिप एकच भाषण, राज ठाकरेंवर दबाव असावा - जयंत पाटील

सांगली : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे दुर्लक्ष करणार असून राष्ट्रवादीवर बोलल्याशिवाय ठाकरे यांचे भाषण टीव्हीवाले दाखवतील का? तसंच शरद पवार (Sharad Pawar)  यांच्यावर बोलल्याशिवाय कव्हरेज मिळत नाही. तसंच राज ठाकरेंचे भाषण केवळ एंटरटेनमेंट साठी असून त्यांच्या या भाषणाला महाराष्ट्र किंमत देईल असे वाटत नाही अशी टीका राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)  यांनी केली ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम देखील हुशार झालेत आणि हे सगळं मतांच्या राजकारणासाठी चालले आहे. हे जनतेला सगळं कळतंय. मुस्लिम आणि हिंदूंच्या विकासाचे यांना काही देणेघेणे नाही. हे देखील त्यांच्या लक्षात आलं आहे. पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) किती वाढले राज साहेब याच्यावर तुम्ही बोला. यावर तुम्ही बोलत नाही. त्यांना अडचणीत आणण्याचे तुम्ही काहीच बोलत नाही. त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली आहे. त्यावर ते बोलत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

राज ठाकरे कुठेतरी भाषण करतात त्याला फारसे महत्त्व नाही. तसेच चार तारखेला हनुमान चालीसाबाबत (Hanuman Chalisa) विचारल्यानंतर ते राज ठाकरे यांनाच विचारावं. राज ठाकरे यांनी आज वेगळे काही असे भाषण केले आहे. असे मला वाटत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार साहेबांनी त्यांच्या मुलाखतीत घेतले आहे. सारखी तीच क्लिप फिरवायची भाषण तेच करायचं त्यामुळे त्यांच्यावर दबाव असावा असे मला वाटतं असही पाटील म्हणाले.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e