पुण्यातून बेपत्ता, अलीबागमध्ये अंत! दोन चिमुकल्यांसह पुरुष आणि महिलेचा हॉटेलमध्ये मृतदेह

धक्कादायक! दोन चिमुकल्यांची हत्या करुन पुरुष आणि महिलेने आत्महत्या केल्याची शक्यता, प्रकरणाचं गुढ वाढलं
रायगड : रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन चिमुकल्यांची हत्या करुन एका पुरुष आणि महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

एक पुरुष आणि एक महिला दोन लहान मुलांसह रायगडमधल्या अलिबाग इथं आले होतं. अलिबागमधल्या ब्लॉसम कॉटेज इथं हे चारही जण थांबले होते. हे चारही जण पुण्यातून आल्याची प्राथमिक माहिती आहे.


पुण्यातील शिक्रापूर परिसरातून मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला आणि पुरुषांने 2 चिमुरड्यांची हत्या करून आत्महत्या केली. अलिबाग शहरातील ब्लॉसम कॉटेज या लॉजवर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 11 मे पासून हे चौघेही या लॉजवर राहत होते.

आज दिवसभर रूम मधून कुणीच बाहेर न आल्याने तिथल्या कर्मचाऱ्याने रूम उघडून पाहिले असता दोघेही गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेत दिसले. तर दोन चिमुरड्यांचे मृतदेह बेडवर पडलेले होते. चौघांचेही मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत. 

मृतांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. कुणाल चिंतामण गायकवाड आणि प्रियंका संदीप कांबळे अशी त्यांची नावे आहेत. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथून दोघेही 2 मे पासून बेपत्ता होते. यातील महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने पोलिसात केली होती. या दोघानी आत्महत्या का केली आणि चिमुरड्यांची हत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. 

धक्कादायक म्हणजे पुरुष आणि महिला पती-पत्नी नसल्याची माहिती समोर आली आहे.  महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने पोलिसात दिली होती. 


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e