माहुर/प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या. नाभिक संघटना माहूरतर्फे तहसिलदार यांना दिले निवेदन. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने किनवट येथील शरयू रुग्णालयात साफसफाईचे काम करणार्या अल्पवयीन मुलीला धमकाउन डॉ. विकास सूंकावार या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला, ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असून तिचा गर्भपात केला ही घटना उघडकीस येउ नये यासाठी तिच्या कुटुंबियांना दमदाटी करून प्रकरण दाबण्याचा निंदनीय प्रयत्न केला.या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून पिडीत मुलीने किनवट पोलीसांत दिलेल्या फिर्यादीवरून त्या धर्मा विरोधात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला परंतू गर्भपात व बाल कामगार कायद्याअंतर्गत कलमानुसार गून्हा दाखल होणे अपेक्षित होते परंतू तसे झाले नसल्याने आरोपीला पाठीशी घातले जात असून आरोपीला अभय दिले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नाभिक संघटना माहूरतर्फ तहसिलदार किशोर यादव यांंचेकडे दिलेल्या निवेदनातून। करण्यात आला आहे, सदर खटल्याची जलदगती न्यायालयात सुनावणी घेऊन आरोपी डाॅ. विकास सूंकावार या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच गर्भपात करण्यासाठी सहकार्य करणार्या आरोपींचा शोध घेउन त्यांचे विरोधात कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नाभिक संघटनेतर्फे लोकशाही पध्दतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देण्यात आला असून या निवेदनावर जगदीश लोहकरे, गंगना पोलसवार, बाळू दवने, किशोर शिरषूरकर, कैलास राऊत, योगेश खूळखूळे,बाबाराव चिल्लेकर, नविन राऊत, संजय वडसकर, विनोद लिंगनवार, प्रदीप शेरकूरवार, विलास राऊत, विष्णू गूंडलवार, सुरेश शिंदे, संजय वानखेडे, अमोल कोकाटे, राहूल राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments