हिंगाेली : हिंगोली (hingoli)
येथील आदर्श महाविद्यालय परिसरात असलेल्या शासकीय आदिवासी वस्तीगृहातील
एका युवतीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी औंढा तालुक्यातील वाळकी येथील योगेश धनवे याच्यावर पाेलीसांनी (police) गुन्हा दाखल केला आहे.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार योगेश याने संबंधित युवतीस लग्नासह वेगवेगळी आमिषे दाखवत चार मे रोजी हिंगोली येथून पळवून नेत वाशीम जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यानंतर त्याने युवतीस घटनास्थळी सोडून देत तेथून पळ काढला.
या घटनेनंतर युवती हिंगोली पोलिसांना एका खाजगी रुग्णालयात आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.
युवतीच्या तक्रारीवरुन हिंगोली शहर पोलिसांनी योगेश धनवे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
0 Comments