सोलापूर -
एका अल्पवयीन मुलीस बार्शीत एका महिलेकडे रहावयास लावून तिला वेश्याव्यवसाय करावयास लावला, नंतर आईने जबरदस्तीनं विवाह लावून दिला.
पतीने इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी बार्शी (Barshi) शहर पोलिसात (Police) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिची आई,सासू आणि पती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पीडित अल्पवयीन मुलीला वडील नसल्याने तिची आई दोघी बहिणींना घेऊन पुण्याहून सोलापूरला (Solapur) राहण्यास आली.
आई सोलापुरात एका व्यक्ती सोबत मुलींना घेऊन राहू लागले. त्यामुळे यातील पिडितेने त्याला सोडून दे, नाहीतर आम्ही इथे राहणार नाही. अशी भूमिका घेतली पण तिची आई त्या व्यक्तीला सोडण्यास तयार नव्हती.ती विरोध करू लागल्याने, पीडित मुलीला तिची आईने बार्शी येथे तीन वर्षांपूर्वी मैत्रिणीकडे सोडून गेली. त्यानंतर तेथे वेश्याव्यवसाय चालतो हे तिला समजले.
काही दिवसांनी आईने फोन करून, तिथेच राहा आणि तेच काम कर असे सांगितले. बार्शीत ज्या महिलेकडे सोडले होते, तेथून 15 फेब्रुवारी 2019 रोजी पीडित मुलीने स्वतःची सुटका करून घेत, ती सोलापुरात आईकडे आली. त्यानंतर 6 जानेवारी 2020 रोजी वय 18 पेक्षा कमी असताना तिचे एका व्यक्तीशी लग्न लावून दिले. त्यानंतर पतीने जबरदस्ती शारिरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास शेळके करत आहेत.

0 Comments