केतकी चितळेच्या प्रतिमेस राष्‍ट्रवादीचे जोडे मारो; शिंदखेड्यात गुन्हा दाखल

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार याच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरूध्द शिंदखेडा पोलिस ठाण्यात रविवारी (ता 15) रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुपारी शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अभिनेत्री चितळे हिच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले होते.
शिंदखेडा शहरातील वरपाडा चौफुलीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याबाबतीत सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. याप्रकरणी जोडो मारो आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मोतीलाल पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक जगताप, युवक जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे, शिंदखेडा शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला तालुकाध्यक्षा ज्योती मराठे आदी उपस्थित होते.

रात्री उशिरा गुन्‍हा दाखल

जोडो मारो आंदोलन करण्यात आल्यानंतर शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरिक्षक सुनिल भाबड यांना निवेदन देवून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी रात्री उशीरा शिंदखेडा पोलिस ठाण्यात अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e