दिनांक १२ मे २०२२ रोजी दुपारी ३ वाजता २० वर्षीय विवाहित तरुणी गुजराल पेट्रोल पंपाजवळून घराकडे जात होती. यावेळी निखील वना सोनवणे (आहुजा नगर निमखेडी, जळगाव) याने त्याच्या जवळील मोटार सायकल रस्त्यात आडवी लावून तरुणीजवळ येऊन रस्ता अडवून म्हणाला की, "तू माझी नाही झाली तर तुला मी कोणाचीच होऊ देणार नाही" असे म्हणून त्याने त्याच्या हातातील चाकूचा धाक दाखविला. तसेच तरुणीच्या हातातील फोन हिसकावून घेतला. त्यानंतर मोटार सायकलीवर बसवून शिवाजी नगर येथील त्याच्या मावशीच्या घरी नेवून तरुणीला एका खोलीत कोंडून ठेवले.
तसेच १९ मे २०२२ रोजी सकाळी ५ वाजता तरुणीच्या राहत्या घराचे वॉलकंपाऊंडची भिंतीवरून उडी मारून हातात काचेची बाटली आणून पीडित तरुणीच्या वडिलांना शिवीगाळ केली. तसेच पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात निखिल सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहेत.
0 Comments