धुळे येथे वाहनातील बॅटरी चोरी; पोलिसांनी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

धुळे : गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील अवधान परिसरातून खडी क्रेशर व डंपर वाहनातून जवळपास 5 बॅटऱ्या चोरी गेल्याची घटना उघडकीस आली होती. यासंदर्भात मोहाडी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती 
बॅटरी चोरीबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली असता परिसरातील एका संशयितावर संशय बळावल्याने पोलिसांनी या संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून तपासणी केली असता या संशयितानेच या पाचही बॅटऱ्या चोरी केल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संशयिताकडून चोरी गेलेल्या पाचही बॅटऱ्या तसेच चोरी दरम्यान वापरात आलेले दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. यासंदर्भात पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e