पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक शिवाजी पितांबर चौधरी हे कुटूंबियांसह शहरातील कोकणीहील परिसरातील साईबाबा नगरात वास्तव्यास असून ते बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत मोहिनी निलेश पाटील (वय ३२) रा. गणेश नगर, जैन पेट्रोल पंप जवळ नंदुरबार हिने बंद घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडत आत प्रवेश करून लोखंडी कोठी व प्लायवुडच्या कपाटातून ३ लाख १० हजार रुपयांची रोकड आणि ८ हजार रुपये किंमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात एक सोन्याचे बिस्कीट व एक कॉईन असा ऐवज चोरुन नेला होता. शिक्षक शिवाजी पितांबर चौधरी हे आपल्या घरी परतल्यावर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती कळविली. ही घटना ११ ते १३ मे रोजीच्या दरम्यान घडली आहे.
0 Comments