नेमक काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गाऊन मार्केटमध्ये कपडे शिवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात ३६ वर्षीय विधवा महिला काम करते. या महिलेचे दयानंद फुगारे या ३६ वर्षीय इसमाशी प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणांवरून या महिलेनं दयानंद सोबत असलेले प्रेमसंबंध तोडले होते. त्यामुळे दयानंदनं पीडित महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली. दयानंदने या महिलेशी प्रेमसंबंध ठेवण्यासाठी तिच्यामागे तगादा लावला होता. मात्र पीडितेनं त्याला नकार दिल्यानं त्यांच्यात वाद झाला. याच वादातून दयानंद यानं सोमवारी सकाळी पीडित महिला काम करत असलेल्या कारखान्यात जाऊन तिच्यावर कात्रीने वार केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या धाडसाने पीडित महिलेला वाचवलं. या प्रकारनंतर कारखान्यातील कर्मचारी सदर पीडितेजवळ जमा झाले.
दरम्यान, आरोपी दयानंदने पीडित महिलेवर कात्रीनं वार केल्यानंतर कारखान्यात खळबळ उडाली. या हल्ल्यात पिडीत महिलेच्या पाठीला दुखापत होऊन ती खाली पडली. पीडितेच्या जवळच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगवधान राखत घटनेवेळी मध्यस्थी करत महिलेला वाचवलं. त्यामुळं कारखान्यात होणारा मोठा अनर्थ टळला. यावेळी कामगारांनी दयानंद याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांच्या तावडीतून निसटून पसार झाला. अद्याप पोलिसांकडून आरोपीवर गुन्हा दाखल झाला का ?, याची माहिती मिळाली नाही. मात्र, सदर प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
0 Comments