शहरातील गोल्डन जुबली या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या स्वयंमची संध्या परीक्षा सुरू असल्याने तो सकाळी पोतदार शाळा मंठा चौफुली परिक्षा सेंटरवर जाण्यासाठी त्याच्या घरातुन त्यांची वॅगनरमध्ये चालक अक्षय घाडगे यांच्या सोबत गेला, घाडगे हा त्याला सोडून घरी परत आला, त्या नंतर दुपारी 12.30 सुमारास अक्षय घाडगे याला स्वयंमला आणण्यासाठी गाडी घेऊन पाठवले असता तो परतला नसल्याने महावीर सुभाषचंद्र गादीया यांनी त्यांच्या मोबाईल वरुन चालक अक्षयला फोन केला असता तेव्हा समोरुन अनोळखी व्यक्तीने हिंदी भाषेमध्ये '4 करोड रुपये लेके अंबड चौफुली आजाव बच्चेको लेके जाओ' असे म्हणुन फोन कट केला.
स्वयंमचे वडील महावीर व नारायण रामभाऊ सुरासे दोघे अंबड चौफुली येथे गेले असता पुन्हा मोबाईलवर कॉल केला असता अबंड येथे या असे सांगण्यात आले. मुलाचे अपहरण झाल्याचे कळताच महावीर गादीया यांच्या भावाच्या तक्रारी वरून तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून जिल्हा भरात नाकाबंदी करण्यात आली असून आरोपीचा शोध पोलीस करत आहे.
0 Comments