गुजरात दंगलीत गोध्रा ट्रेनच्या एका डब्ब्याला आग लागल्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासहित ६८ लोक मारले गेले होते. या घटनेवर सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या एसआयटीने नरेंद्र मोदी यांच्यासहित इतरांना क्लिनचीट दिली होती. त्यामुळे काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरीने सर्वोच्च न्यायालयात त्या क्लिनचीट विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका शुक्रवारी फेटाळली.
त्यानंतर शनिवारी सकाळी अमित शाह यांनी एएनआयच्या मुलाखतीत सेटलवाड यांनी एनजीओच्या मदतीने गुजरात दंगलीची तथ्यहीन माहिती दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गुजरात एटीएस पथकाने तीस्ता सेटलवाड यांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. पुढे मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर गुजरात एटीएस पथकाने अहमदाबाद येथे घेऊन रवाना झाले आहेत.
काय म्हणाले होते अमित शाह ?
सुप्रीम कोर्टाने अलीकडेच दिलेला निर्णय, दंगलीशी संबंधित घटनांमध्ये माध्यमे, एनजीओ, राजकीय पक्षांची भूमिका याबाबत त्यांनी भाष्य केलं. मोदीजींनी चौकशीला सर्व सहकार्य केले. कुणीही धरणे धरले नाहीत. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले नाहीत. संविधानाचा कशाप्रकारे सन्मान केला जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण नरेंद्र मोदींनी समोर ठेवले आहे. आरोप करणाऱ्यांनी माफी मागायला हवी, असं अमित शाह यांनी सांगितलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीबाबत एएनआयशी बोलताना सांगितलं की, 'अधिकारी आणि पोलीस प्रशासनानं दंगल नियंत्रित करण्यात चांगले काम केले. मात्र, घटनेमुळे गोध्रा ट्रेन
जळीतकांड प्रकरणामुळे लोक संतप्त होते. त्याची कुणकुण कुणालाच लागली नाही. ना पोलिसांना, ना कुणाला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात राहू शकली नव्हती.'
0 Comments