आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर पोलीस बंदोबस्‍त

पारोळा  : सध्या राज्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरुद्ध राज्यभरात शिवसैनिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. तसेच आमदारांच्या छायाचित्रांना नावांना तसेच कार्यालयावर हल्लाबोल केला जात असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पारोळा येथील  आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर राज्य पोलीसकर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे 
मुंबईत शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याने अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर पारोळा  येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर पोलीसांचा खडा पहारा लावण्यात आला आहे. दरम्यान शहरात कायदा व सुव्यवस्था शांततेत असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान सकाळी पाच व रात्री पाच अशी एकूण दहा पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे

आमदार सोनवणेंच्‍या बंगल्‍याबाहेर बंदोबस्‍त

जळगाव : जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा मतदार संघातील आमदार लता सोनवणे या देख एकनाथ शिंदे यांच्‍या गटात सहभागी झाल्‍या आहेत. बंडखोरी केल्‍याने संतप्‍त शिवसैनिकांकडून तोडफोड केली जात आहे. यामुळे सुरक्षा म्‍हणून आमदार लता सोनवणे यांच्‍या जळगावातील बंगल्‍यावर पोलिस सुरक्षा वाढविली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e