औरंगाबाद: शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. बंडखोरीमुळे सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. यापार्श्वभूमीवर आता कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी खळबळजनक दावा केला आहे.
कन्नडचे आमदार उदय सिंग राजपूत यांनी मलाही ५० कोटींची ऑफर होती, असा दावा त्यांनी केला आहे, पण मी गद्दारी केली नाही. माझ्या पेट्रोल पंपावर दोन फॉर्च्युनर भरुन पैसे आले होते. सीसीटीव्ही फुटेज पण आहे. मी भद्रा मारुतीवर हात ठेवून सांगायला तयार आहे. १०० कोटी दिले तरी मी गद्दारी करणार नाही, असंही राजपूत म्हणाले. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबई केंद्रशासीत करण्यासाठी शिवसेना संपवण्याचा डाव
शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेत अभी फूट पडल्याचे दिसत आहे, त्यामुळे आता मुंबईसह राज्यभरात मेळावे घेण्यात येत आहेत. आज दहीसर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांवर टीका केली.
'मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी शिवसेना संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. आम्ही हा प्रयत्न हाणून पाडत आहे, त्यामुळेच शिवसेनेला संपण्याचा कट शिजत असल्याचेही संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेला एकच बाप -
तसंच आता त्या हॉटेलमध्ये जे ४० लोकं आहेत ती जीवंत प्रेत, मुडदे आहेत. महाराष्ट्रात येताना त्यांच्या फक्त बॉडी येणार, त्यांच्यातील आत्मा मेलेला असणार, ते सध्या ती लटपटतायत. त्यांना माहिती आहे इकडे आग पेटली आहे. अशा कठोर शब्दात त्यांनी बंडखोरांवर टीका केली. दरम्यान, ते हॉटेल नव्हे तर बिगबॉसचे घर वाटतं आहे. बसतायत पितातायत आणि खातायत असा टोलाही त्यांनी आमदारांना लगावला.
ते पुढी म्हणाले, 'शिवसेनेला एकच बाप आहे आणि तो बाप कोणाला चोरता येणार नाही. आमची बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि तेच आमचे बाप आहेत. मात्र, बंडखोरांचा एक बाप नाही, दिल्लीत ४, गुजरातमध्ये ३, गुवाहाटीत २ आणि मुंबईत अजून काही बाप आहेत अशा शब्दात त्यांनी बंडखोरांवर टीकास्त्र डागलं.
0 Comments