जरा खट्टं झालं की कर खून! नाशिक होतंय महाराष्ट्राचं नवं क्राईम कॅपिटल?

महाराष्ट्रतील देवभूमी अशी नाशिकची ओळख. मात्र हीच सकारात्मक ओळख कुठेतरी पुसली जातेय असं म्हंटल तर वावगं ठरू नये.
महाराष्ट्रतील देवभूमी अशी नाशिकची ओळख. मात्र हीच सकारात्मक ओळख कुठेतरी पुसली जातेय असं म्हंटल तर वावगं ठरू नये. देवभूमी नाशिक आता महाराष्ट्राचं नवं क्राईम कॅपिटल होतंय की काय असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय.

नाशिक जिल्ह्यात फक्त 18 दिवसात 17 खून झाल्याने नाशिक आता गुन्हेगारांचं शहर म्हणून समोर येतंय. शहरात गेल्या 14 दिवसांत कौटुंबिक कारणांतून, कुरापत काढून किंवा क्षणिक रागाच्या भरात सात जणांचे खून झाले. तर ग्रामीण भागातही 10 खून झाले आहेत. 

नाशिक शहरात पाईपलाईन रोडवर पुन्हा एकदा एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना आज सकाळी घडली. पवन नथु पगारे या तरुणाचा मृतदेह गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाईपलाईन रोडवर आढळून आला आहे.

याप्रकरणी संशयित आरोपी अतुल अजय सिंगला पोलिसांनी गजाआड केलेय. दरम्यान, महिला पोलिस कर्मचारी सरला खैरनार यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर नाशिक पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी घटनास्थळी भेट दिलीये
 
या घटनेमागे क्षुल्लक कारण असल्याचेही तपासात पुढे आले आहे. जिल्ह्यातील 16 पैकी सात खून हे कौटुंबिक कारणांमधून झाले आहेत. त्यात दोन मुलांचा त्यांच्याच वडिलांनी, पती पत्नींनी एकमेकांचा खून केला आहे. तर इतर खून मित्र अनैतिक संबंध, चेष्टामस्करी, क्षणिक कारणांतून झाले आहेत. त्यामुळे कौटुंबिक आणि सार्वजनिक ठिकाणावरील हिंसा वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे.

यातील  क्षुल्लक कारणावरून किंवा संतापाच्या भरात जिवे मारण्याचे प्रकार वाढल्याने हा एक चिंतेचा विषय झाला आहे.  खुनासोबतच जिवे मारण्याचा प्रयत्न हाणामारीचे प्रकारही सर्रास घडत असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडलाय.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e