पतीनेच दगडाने ठेचून केली पत्नीची हत्या; पोलीस तपासात झाले उघड

शिरपुर : नटवाडे (ता.शिरपूर) येथे अर्धवट जळालेल्या महिलेच्या मृतदेहाचा मृतदेह आढळून आला होता. परंतु पतीनेच आपल्या पत्नीची दगडाने ठेचून निर्घुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना पोलीस  तपासात उघडकीस आली आहे
पत्नीची निर्घुणपणे हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने पतीने ज्वलनशील पदार्थ पत्नीच्या अंगावर टाकून तिला जाळण्याचा देखील प्रयत्न केला आहे. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाल्यानंतर तिचा अर्धवट जळालेला मृतदेह परिसरातील नागरिकांना आढळून आल्यानंतर या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी शिरपूर पोलिसांना दिली होती. शिरपूर पोलिसांनी हा अर्धवट जळालेला महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपासाची चक्रे फिरवली असता अवघ्या 24 तासात या महिलेच्या मारेकर्‍याचा तपास शिरपूर पोलिसांनी लावला आहे.

अनैतिक संबंधातून हत्‍या

अनैतिक संबंधाच्या वादातून हे हत्याकांड झाले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चुलत सासऱ्या बरोबरच अनैतिक संबंध असल्याच्या वादावरून गेल्या काही दिवसांपासून पती- पत्नीमध्ये वाद सुरू होता. त्यानंतर 13 मे रोजी पत्नी घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर यासंदर्भात डोक्यात राग धरून पतीने घरातून निघून गेलेल्या पत्नीला घरी आनत असताना रस्त्यातच दगडाने ठेचून तिची निर्घुणपणे हत्या केली होती. पोलीस तपासादरम्यान पतीनेच हा खून केला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या खुणी पतीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e