राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नसल्याने जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर राज्य उत्पादन शुल्क विभाग ऍक्शन मोडमध्ये आल्याने गुप्त माहितीच्या आधारे भरारी पथकाने नंदुरबार तालुक्यातील न्याहली शिवारात दोंडाईचा ते नंदुरबार रस्ता न्याहली गावाजवळ टाटा कंपनीचा पॅक बॉडी असलेला कंटेनर (क्र. MH- 46- F 4868) सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल ब्ल्यु व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या एकुण १ लाख ३६८० पेट बाटल्या (२१६० बॉक्स) दिसुन आले. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलमान्वये करण्यात आली. सदरची कार्यवाही डी. एम. चकोर निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार, पी. जे. मेहता, दु. निरीक्षक, एस.एस. रावते दुय्यम निरीक्षक, पी. एस. पाटील दु.निरीक्षक सोबत जवान सर्वश्री अविनाश पाटील, भुषण एम.चौधरी, हितेश जेठे, वाहन चालक हेमंत पाटील, राजेंद्र पावरा, एम.एम. पाडवी, संदीप वाघ, हर्षल नांद्रे इत्यादींनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी. जे. मेहता दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करीत आहेत.
0 Comments