मुंबई : आताची एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडी चौकशीला जाणार नसल्याची माहिती आहे. साई रिसॉर्टप्रकरणी त्यांना समन्स ) पाठवण्यात आलं होतं. आज 11 वाजता त्यांची चौकशी होणार होती. पण आधीच्या नियोजित कामामुळे ते चौकशीला हजर राहणार नाहीत.
मात्र, असं असलं तरी, अनिल परब यांचे वकील ईडी कार्यालयात जाणार आहेत आणि काही कामामुळे परब हजर राहणार नसल्याची माहिती ते ईडीला देणार आहे. साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे.
अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला होता. या रिसॉर्ट प्रकरणात काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं होतं
त्यानंतर आता अनिल परबांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र आता अनिल परब हे चौकशीसाठी आज हजर राहणार नसल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अनिल परब हे मुंबईबाहेर असल्याने ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार नाही. आज त्यांचे वकील हे ईडी कार्यालयात जाणार असून काही कामामुळे परब हजर राहणार नसल्याची माहिती देतील. तसंच पुढची तारीख मागून घेतील, अशी माहिती आहे.

0 Comments