मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भावनिक आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांनी बंड सुरूच ठेवलं आहे. एकनाथ शिंदे आसाम मधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये तळ ठोकून बसले आहे. आम्ही महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढला असल्याचं शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे.
शिंदे गटाच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपने (BJP) आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तसंच अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशातच प्रताप पाटील चिखलीकर यांनी येत्या दोन ते तीन दिवसांता राज्यात भाजपचं सरकार येईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन विठ्ठलाची पूजा करतील असं विधान केलं आहे.
इतकंच नाही तर, एकनाथ शिंदे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. आमदारांबरोबरच शिवसेनेचे 10 ते 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान चिखलीकर यांनी केलेल्या या विधानाने राज्यात भाजपची सत्ता येईल आणि पुन्हा एकदा फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
0 Comments