अवैध सावकाराच्या १२५ मालमत्ता एलआयसीकडून साडेपाच कोटींचे कमिशन

धुळे : वादग्रस्त अवैध सावकार राजेंद्र बंब व त्याच्या कुटुंबियांच्या नावे २०१० पासून तब्बल १२५ मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती येथील दुय्यक उपनिबंधक कार्यालयाने पोलिसांना  दिली. या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली.
अवैध सावकार व एलआयसी एजंट राजेंद्र बंब व भाऊ संजय बंब याच्याविरोधात शहर, आझादनगर, देवपूर पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यात राजेंद्र बंब अटकेत असून, त्याचा भाऊ संजय फरारी आहे. फिर्यादी जयेश दुसाने याने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. बंब याच्याकडे आतापर्यंत सुमारे १२ कोटींहून अधिक रकमेची रोकड, १२ कोटींहून अधिक रकमेचे दागदागिने सापडले आहेत. तसेच शेकडो सौदा पावत्या, खरेदी खते, गहाण खते, ठेव पावत्या सापडल्या आहेत. असे असताना पोलिसांनी इन्कम टॅक्स, एलआयसी, दुय्यम उपनिबंधकांकडून विविध प्रकारची माहिती तपासासाठी मागविली. त्याप्रमाणे दुय्यम उपनिबंधकांनी बंब व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे २०१० पासून ठिकठिकाणी १२५ मालमत्तांची खरेदी झाल्याची माहिती दिली
 पत्‍नीच्‍या नावे तब्‍बल २२९ विमा पॉलिसी

तसेच एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार २००९ पासूनचे एजंट राजेंद्र बंब व त्याची पत्नी सोनल बंब यांनी पाच हजार २२९ विमा पॉलिसी काढल्या असून, यापोटी त्यांना पाच कोटी ४० लाख ५३ हजार ७२० रुपयांचे कमिशन मिळाले आहे. यात कर्जदारांना दबाव टाकून विमा पॉलिसी काढायला लावणे, पहिले दोन हप्ते कर्ज देतानाच काढून घेणे, मध्येच पॉलिसी बंद केली, तर सरेंडर फॉर्मच्या माध्यमातूनही पैसे मिळविणे आदी उद्योग अवैध सावकार बंब याने केल्याची तक्रार आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू ठेवला असून, तपासाला सहकार्य न करणाऱ्या राजेंद्र बंब याने पुढेही असहकार्याचे धोरण ठेवले, त्याच्या कमाईविषयी माहिती दिली नाही, कोट्यवधींची रोकड कुठून आणली आदी माहिती दिली नाही, तर त्याची आढळलेली मालमत्ता, जप्त रोकड, दागदागिने सरकारजमा केले जातील, असे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितल 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e