दीड लाख रुपयाचा पकडला गुटखा पोलिसांची धडक कारवाई

बुलडाणा : गुटखा बंदी असताना देखील सर्रास गुटखा आयात व विक्री केली जात आहे. अशा प्रकारे चोरून गुटखा वाहतुक करत असलेले वाहन मलकापुर पोलिसांनी पकडले आहे. यात सुमारे दीड लाख रूपयांचा गुटखा आढळून आला आहे.
राज्यात गुटखा बंदी असताना जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्रीसाठी आणल्या जात आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री जिल्ह्याचे असताना सुद्धा जिल्ह्यात करोडो रुपयाचा गुटखा आणला जात आहे. दर आठवड्यात जिल्ह्यात कुठेतरी गुटखा पकडल्या जात आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत आहे. तसेच मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे  यांचे सुद्धा गुटखा विरोधात कडक पाऊले उचलताना दिसत नसल्याने गुटखा माफीयांचे चांगलेच फावत आहे. म्हणून माफीयांची त्यांची हिम्मत होत असल्याची जिल्हाभर चर्चा आहे.

दोन आरोपी ताब्‍यात

मलकापूर येथे रात्रीच्या सुमारास मलकापूर पोलिसाना मिळालेल्या गुप्त माहितीवरून राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी दोन वाहनाची कसून तपासानी केली असता लाखो रुपयाचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी दीड लाख रुपयाचा गुटखा व वाहने जप्त केले असून दोन आरोपीना ताब्यात घेऊन गुटखा बंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e