मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी शेखर बागडे यांनी दिलेली माहिती अशी की,व्यावसायिक सुरेंद्र पाटील ठाकुर्ली चोळेगाव येथील रहिवासी असून दावडी गावात पाटीदार भवन येथे त्यांचे कार्यालय आहे. पाटील यांना पाच भोंदूबाबाच्या टोळीने दहाटक्के पैसे पूजेसाठी दिले होते. त्यानंतर ५० कोटींचा पाऊस पाडून देतो असं आमिष त्यांनी दाखवलं होतं. त्यानुसार 56 लाखांची रक्कम सुरेंद्र यांनी तयार ठेवली. शनिवारी रात्री या भोंदूबाबाच्या टोळीने त्याच्या पाटीदार भवन कार्यालयात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पुजा सुरू केली.
पहाटेच्या सुमारास या टोळीने सुरेंद्रला त्याच्या इमारतीला पाच प्रदक्षिणा मारण्यास सांगितले. सुरेंद्रने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी या टोळीने संधीचा फायदा घेत त्यांना दिलेले ५६ लाख रुपये घेवून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी मानपाडा पोलिस ठाणे गाठले.अशोक गायकवाड,रमेश मुकणे,संजय भोळे ,गणेश,शर्मा गुरुजी नावाच्या पाचही जणांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर चार संशयित आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
0 Comments