बंडखोर आमदारांच्‍या निषेधार्थ धुळ्यात मोर्चा

धुळे : मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर धुळ्यात उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहेत. मुख्‍यमंत्री उध्दव ठाकरे समर्थक शिवसैनिकांतर्फे बंडखोर आमदार व मंत्र्यांच्या निषेधार्थ मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर धुळ्यात  उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. यामुळे दे धक्का कर भनका असे म्हणत मंत्री एकनाथ शिंदे यांनी गोवाहाटी येथे कैद करून ठेवलेले 50 कोटींचे कुत्रे या आशयाचे फलक देखील झळकवत  शिवसैनिकांनी मोर्चा काढला. यात धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार त्याचबरोबर, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे यांच्यासह आणखी इतर मंत्र्यांच्या प्रतिमेला कुत्र्याची उपमा देत या आशयाचे फलक झळकावले आहेत 

फोटोला मारले जोडे

त्याचबरोबर या सर्व बंडखोर मंत्र्यांच्या व आमदारांच्या फोटोला जोडे मारून व घोषणाबाजी करत मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा देखील सहभाग असल्याचे बघायला मिळाले आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e